दि. १६ ऑगस्ट १९८३ रोजी १० x १० च्या जागे मध्ये श्री अनंत वस्तू भांडार या दुकानाची सुरुवात झाली. श्री. अनंत मुकुंद आगाशे यांनी त्यांच्या मनातील संकल्पना प्रत्यक्षात आणली. अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने त्यांनी व्यवसाय चालू केला. दर्जेदार माल, स्वच्छता, योग्य वाजवी दर आणि ग्राहकांशी नम्र वागणूक या वैशिष्ट्यांनी श्री. अनंत आगाशे यांनी व्यवसाय वाढवत नेला. काळाप्रमाणे व्यवसायात बदल करुन त्यांनी आत्तापर्यंत सहा वेळा सर्व दुकानाच्या व्यवस्थे मध्ये बदल केला. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांत पहिल्यांदा सर्व कडधान्ये, डाळी हे जिन्नस प्लॅस्टीक पिशवीमध्ये पॅकींग करुन विकण्याचा मानस त्यांनी केला. त्याला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यानंतरचा दुकानातील मोठा बदल म्हणजे रत्नागिरीच्या किराणा व्यापारामध्ये पहिल्यांदा कॉम्प्युटर सिस्टीमचा वापर सुरू केला. सुरुवातीला ऑफ लाईन बिलींग केले जाई. त्यानंतर त्यात प्रगती करुन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सर्व हिशोब, स्टॉक, ऑन लाईन बिलींग कॉम्प्युटरवर चालू केले आणि सर्वांत पहिल्यांदा ग्राहकांसाठी घरपोच मालाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
त्यानंतर एक लाक्षणिक व मोठा बदल म्हणजे दि. २५ नोव्हेंबर २०१५ रोजी श्री अनंत वस्तू भांडार हे आता डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये रुपांतरीत झाले. एक मोठे पाऊल व काळाची गरज, तरुणाईची ओढ या सगळयांना लक्षात घेऊन रत्नागिरीतील पहिले ए/सी डिपार्टमेंटल स्टोअर करण्याचा मान पण श्री. अनंत आगाशे यांना मिळाला. त्याचप्रमाणे सर्व कामगारांना ड्रेस कोड, अत्यंत जलद अशा बारकोड सिस्टीमवर संपूर्ण डिपार्टमेंटल स्टोअर कार्यरत केले. ज्यामुळे ग्राहकांना जिन्नस घेतल्यावर त्वरीत मराठीमध्ये बील मिळू लागले व त्यांचा वेळ वाचला. तसेच पॅकींग विभागाला अजून सक्षम करुन पूर्णपणे स्वयंचलित पॅकींग आणि सिलींग मशीन घेऊन अत्यंत सुबक व टापटीप पद्धतीने पॅकींग होऊन कर्मचाऱ्यांचा वेळही वाचू लागला. डिपार्टमेंटल स्टोअर्सची घडी नीट बसल्यानंतर ग्राहकांच्या मागणीला मान देऊन घरबसल्या किराणा जिन्नसांची यादी Whatsapp तंत्रज्ञानाच्या मदतीने पाठवून ते जिन्नस ग्राहकांना घरपोच देण्याची सुविधाही श्री अनंत वस्तू भांडारने सर्वप्रथम सुरू केली आणि ग्राहकांनी त्यालाही भरघोस प्रतिसाद दिला.
याचप्रमाणे ‘आगाशे फूडस्’ या रजिस्टर्ड ब्रॅण्डची स्थापना झाली. सौ. अनुजा आगाशे यांनी त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यातून घरगुती स्वरुपाचे सर्व प्रकारचे मसाले, विविध चटण्या, निरनिराळया प्रकारचे लाडू, चविष्ट इन्स्टंट पीठे, निरनिराळया भाजण्या, विविध प्रकारचे घरगुती गहू पीठ, विविध प्रकारचे पावडरीच्या स्वरुपातील मसाले चालू केले. या सर्वाला ग्राहकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला व हे सर्व देश-विदेशात प्रसिद्ध झाले (घरगुती स्वरुपाचा खाऊ म्हणून आगाशे फूडस्ची उत्पादने ऑस्ट्रेलिया, लंडन, जपान, सौदी आदि विविध ठिकाणी जाऊ लागली). या सर्वांच्या मागे खंबीरपणे उभा आहे तो श्री अनंत वस्तू भांडारचा २५ जणांचा कुशल व ग्राहकांशी आपुलकीने वागणारा कर्मचारी वर्ग. आज ३५ वर्षे पूर्ण होऊन श्री अनंत वस्तू भांडार आपल्याला अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने agashestore.in या साईटवर आणि agashestore या नावाने Android PlayStore वर सुद्धा उपलब्ध होत आहे याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमचे agashestore हे Android App खालील लिंक वरून डाऊनलोड करून घेऊ शकता.
Click Here to download agashestore App
आपला,
श्री अनंत मुकुंद आगाशे